STORYMIRROR

Deepa Vankudre

Others

3  

Deepa Vankudre

Others

बिनधास्त

बिनधास्त

1 min
242

आनंदाने जगणे 

आनंटाने मरणे 

होऊनी बिनधास्त 

जगात या उरणे!


पहाटेच्या गारव्यात

बिनधास्त गा तू

पहाडाची शुद्ध हवा

बिनधास्त खा तू 


झाडाच्या सावलीत 

बिनधास्त झोप तू

विसरू नको रोवायला 

एक लहान रोप तू


पाखराचे पंख जणू 

मिळाल्यापरी उड तू 

अफाट सागराच्या 

कुशीमध्ये बुड तू


सबला आहेस, मनी बन

संकल्पाने दृढ तू 

अचाट आत्मविश्वासाने

जगा कर दिग्मुढ तू


साहित्याला गुण द्या
लॉग इन