बिनधास्त
बिनधास्त
1 min
824
झाले आज गगन ठेंगणे
कळले मोल स्वातंत्र्याचे
नाचतेआहे गाते आहे
गीत घेवूनी बिनधास्तपणाचे
वर्तूळातील जीवनाच्या
तोडल्या जरा शलाका
बिनधास्त झाले आज
घेवून मर्यादेचा आवाका
आज मी झाले मुक्त
ना मनही माझे बंधनी
बिनधास्त होवून जगणारमी
जीवनाच्या या रणांगनी
मावळतीचे रंग घेवून
सागरावर उधाण माझे
स्वप्न घेवून स्वातंत्र्याचे
बिनधास्त जीवनाचेच मागणे माझे
