बीजांकूर
बीजांकूर
1 min
256
बीज अंकूरून आले,
कसे कासार पर्वतावर.
पान,फुले ही नटली विविध रंगात.
चित्रकार होऊन,नक्षीकाम ते सुंदर.
माळ रानात प्रगटले,
काय धरतीचा चमत्कार.
शोध करती कित्येक,
कसा घडला हा साक्षात्कार.
रंगीबेरंगी घालून शालू,
जणू नववधु लावण्याची खाण.
मोहवीते ती साऱ्यांस,
घायाळ करून जीव की प्राण.
पाहिल्यात सप्तरंगी रंगात,
कशा सजविल्यात वाटा.
काळजात खोलवर रूतून,
जातो परत भेटण्याचा साठा.
