STORYMIRROR

Anil Chandak

Others

4  

Anil Chandak

Others

भयावह काळ

भयावह काळ

1 min
251

हस्त नक्षत्र,सरले तरीपण,

पावसाचा,अजून पाऊस थांबला नाही रूसलाय....

अन परिणाम, शेतकऱ्यांना भोगावा लागला...

शेतकरी डोळ्यात पाणी आणुन,

आक्रोश करून सांगत आहे.

आमची खरीपाची पिके गेली,

निदान खब्बी तरी घेऊन दे...

 पिके,पावसाने, सडत आहेत,

पण दगडावर डोके आपटून उपयोग काय...

उद्योगपतींच्या पुढे पुढे करतांना,

त्या नालायकांना, शेतीची जाण काय...

बँकांची मोठमोठी कर्जे बुडविणाऱ्या उद्योगपतींच्या पुढे पायघड्या,

अन लाचार शेतकऱ्यांच्या मागे,

वसुलीचा पठाणी हिसका,

अब्रु चारचौघात गेल्यामुळे,

नाईलाजाने फाशी घेत आहेत..

शेतकऱ्यांचा आक्रोश टिपेला पोहोचला आहे...

आंदोलनांवर आंदोलने चालु आहे,

महागाईच्या वरवंट्याखाली,जनता भरडली जात आहे...


बा बळीराजा, आता जगावं की मरावं हा तुझा सवाल आहे....


फळभाज्या,भाज्यांचे भाव ,

 सतत पडत आहेत...

 मलाई दलालांच्या खिशात जात ....

दूध रस्त्यावर ओतून आक्रोश करित...

वणवण फिरत आपला आक्रोश,

टाहो फोडीत


मंदीमुळे रोज लघुउद्योगांना ,

टाळे लागत आहे. 

स्वस्त चिनी वस्तुमुळे ,

नुकसानी झेलावी लागत आहे,

बाजारात आहे, शुकशुकाट ....


विद्यार्थ्यांची आंदोलने वाढली आहेत,

त्यांचे प्रश्न अधुरेच आहेत....


प्रदुषणाने केव्हांच मर्यादा, ओलांडली आहे...

प्लँस्टिकवर बंदी कुचकामी ठरली...


प्रत्येक वेळेस सर्जीकल स्ट्राईक,

370 कलम,राममंदीरचा गजर,

किती दिवस खपवावे...


महागडी फवारणी मारून,

टमाटे मातीमोल भावाने विकत आहे...

सर्वच पक्षातील,राजकिय नेत्यांना,

शेतकऱ्यांची किंमत नाही,

त्यांचे लक्ष फक्त राजकिय गणितांवर अन मलाईवर आहे...


सत्तेच्या सारीपाटावर,

मुंडावळ्या बांधून ,

पुढारी मश्गुल आहेत....

अन बळीराजा,तुझ्या आक्रोशापुढे,

वेळ द्यायला कुणाला सवड आहे..


यापुर्वी ही हे घडत आले आहे..

अन भविष्यातही तेच घडणार आहे...


जनादेशाचा खेळ मांडला,

राजकिय व्यवस्थेचा बोजबारा

पदांची हाव कुरणासाठी,

भ्रष्टाचारी सोकावलेत

जनतेचा पैसा हडपायला...


संधीसाधु राजकारण,

तत्वे तुडवीत,कायद्याची पायमल्ली..

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्या,

मुहूर्त काही लागेना...


जनतेचे लक्ष ज्वलंत प्रश्नांवरून,

उडवित,शत्रु आक्रमणाची भिती,

लांडगा आला रे म्हणत हाराकिरी..


स्रियांची अब्रु कोण राखणार,

आज चौफेर दु:शासन,रावण,

फिरत आहेत....

अन राम , कृष्ण मात्र स्वर्गलोकात......


कुणाला हवा आहे राम,

कुणी मागतो बाबरी..

निकाल जरी लागला तरी,

एक अनामिक भीती,अविश्वास,

दाटला सर्वत्र...


प्रश्न खुप कठीण आहेत,

आजचा, भविष्यातला काळ भयावह....



Rate this content
Log in