STORYMIRROR

.प्रमोद घाटोळ

Others

3  

.प्रमोद घाटोळ

Others

भय

भय

1 min
237

फुकाचे ते भय, व्यर्थ जीव घेई

हिंमतीने वागता, नसे पुढे काही


भिती अन् भ्रांती, मनाचे विकार

याशी न कुठे, तत्त्वाचा आधार


जोडती जे हिंमत, तोच खरा नरं

थरकाप ओढवते ,मृत्यु अढळं


कर्मची साऱ्या , सुखाची ग्वाही

धीटाईने झुंजता, वांझ फळ देई


सदैव जे कष्टती , बळेचि हिरसाने

फिटती पांग सारा ,न उरे गाऱ्हाणे


भय करविते सगळ्या , देहाचा नाश

नका हो आवळू ,अविवेकाचा पाश  


Rate this content
Log in