STORYMIRROR

प्रतिभा बोबे

Others

4  

प्रतिभा बोबे

Others

भय

भय

1 min
267

वाटेवर त्या भयाण शांत 

एकटीच मी चालत होते

माहीत नव्हते माझे मलाच

कुठे बरं मी चालले होते?


किर्र अंधाऱ्या त्या वाटेवर 

सुंदर एका अनामिकेबरोबर

ओळख जुनी असल्यासारखी

चालले होते तिच्या पावलांबरोबर


रातकिड्यांची अखंड किरकिर

सोबत आमची करत होती

अनोळखी त्या महालात मज

घेऊन ती सुंदरी आली होती


कळत नव्हते मला अजूनही

इतकी आपुलकीने ती का वागत होती?

नंतर सांगितले तिनेच मला

ती माझी प्रिय सखी होती


मी मात्र तिला अजुनही ओळखले नव्हते

मोहक हसू गाली आणून तिच अखेर मला म्हणाली

निद्रादेवी असे मी सुखद,मनोरम

जी तुला घेऊन जाते नित स्वप्नमहाली


Rate this content
Log in