STORYMIRROR

Rahul Wade

Others

3  

Rahul Wade

Others

भुके संगे काय खाऊ ...

भुके संगे काय खाऊ ...

1 min
143

महागाई वाढली भाऊ

भुके संगे काय खाऊ


हाताला काम नाही

रोजंदारीला दाम नाही

कुणाच्या दरबारी जाऊ

भुके संगे काय खाऊ


वनवास जन्माचा पुजलेला

फास गळ्याला टांगलेला

न्याय मागण्या कुठे जाऊ

भुके संगे काय खाऊ


नुसती भाषणे होती

सारे आश्वासने देती

पैलतीरी नाव कशी नेऊ

भुके संगे काय खाऊ


जातीय दंगली हिंसाचार

सर्वत्र जुलूम अत्याचार

आक्रोश कुणाला ऐकऊ 

भुके संगे काय खाऊ


काळोख चहूकडे दूर

नयनी आसवांचा पूर

कळेना आता कुठे जाऊ

भुके संगे काय खाऊ ...


Rate this content
Log in