जीणं आमुचं ...
जीणं आमुचं ...
1 min
159
जीणं आमुचं भेसूर आहे
म्हणे आयुष्य सुंदर आहे
दुःखाने गदगदलेले देह सारे
अश्रूंचा नुसता महापूर आहे
काळोख दाटलेला चहू दिशांनी
मनाला सारखी हुरहूर आहे
आभाळ फाटलेले रान पेटलेले
सोबतीला जळता अंगार आहे
जावे कुठे कळेना काही
वाट धुरात धूसर आहे
संपल्या कहाण्या संपले सारे
उष:काल उद्याचा फितूर आहे
