जगता यायला हवं
जगता यायला हवं
1 min
194
मरता कधीही येतं,
जगता यायला हवं..
बुडता कधीही येतं,
पोहता यायला हवं..
रडता कधीही येतं,
लढता यायला हवं..
विझता कधीही येतं,
पेटता यायला हवं..
खचता कधीही येतं,
उठता यायला हवं..
तोडता कधीही येतं,
जोडता यायला हवं..
थांबता कधीही येतं,
चालता यायला हवं..
पडता कधीही येतं,
उडता यायला हवं..
मरता कधीही येतं,
जगता यायला हवं!
