स्मशान जगणे ...
स्मशान जगणे ...
1 min
140
दुःख सारे कोंडलेले
सोडू कुठे उसासा
दाखवेल मला मी
आहे कुठे आरसा
देह सारे गांजलेले
वेळ नसे फारसा
अश्रू भरले नयनां
रोकू कसे पावसा
वैरी झाले आपले
जिवलग नाही असा
जगणे स्मशान झाले
सोसू कळ कसा
देणारे हात विरले
गेला कुठे वारसा
सौख्य नाही जपले
धर्म कुठला असा
