बुद्ध घ्यावे कोरून
बुद्ध घ्यावे कोरून
1 min
246
हिरवा निळा भगवा
घेऊ नये रंग वाटून
मिसळू द्यावे रंग सारे
एक व्हावे आतून
जात धर्म पंथ वगैरे
कायम द्यावे सोडून
बंधुत्वाचे गावे गाणे
हातात हात घेऊन
नको भेदांच्या भिंती
रहावे समान मानून
सारी भुईची लेकरे
घ्यावे नभाळ ओढून
युद्धाने वाढते युद्ध
प्रेमाने घ्यावे जिंकून
द्वेषाने देह पेटले
बुद्ध घ्यावे कोरून
