संगरास उभे आम्ही
संगरास उभे आम्ही
1 min
204
दारिद्रय जन्मोजन्मांचे
भुकेने व्याकुळने आहे
किती आले पावसाळे
अंगणी उन्हाळेच आहे
जीवाचे हे होरपळणे
दुःखाने पोळणे आहे
अश्रूंना बांध नाही
ओघळणे जुनेच आहे
पडझड ही मनाची
देहाचे कोसळणे आहे
जातवर्गाचे हे छळणे
पिढीजात तसेच आहे
पाजळून लेखण्या आम्ही
फुंकले रणशिंग आहे
संगरास उभे आम्ही
लढण्या तय्यार आहे
