STORYMIRROR

Rahul Wade

Others

3  

Rahul Wade

Others

एक दिवा ...

एक दिवा ...

1 min
199

एक दिवा

समतेचा लावू

मनातली जात

दोघेही घालवू


एक दिवा

बंधुत्वाचा लावू

सारे मिळून

ऐकीने राहू


एक दिवा

न्यायाचा लावू

अन्यायाला 

मूठमाती देवू


एक दिवा

प्रेमाचा लावू

द्वेषाला प्रेमानं

जिंकून घेवू


एक दिवा

करुणेचा लावू

बोधीवृक्षाच्या

सावलीत राहू


साहित्याला गुण द्या
लॉग इन