बहिणीची माया
बहिणीची माया

1 min

97
बहीण भावाचा सण,
आहे रक्षाबंधन,
बंधी राखी भावाला,
करुनि रेशीम बंधन.।।।१।।।
श्रावण महिन्याचा सण,
राखी बांधु भाऊराया,
आतुरतेने वाट पाही,
श्रावणी गणराया.।।।२।।।
बंधन आहे राखीचे,
रक्षण करावे बहिणीचे,
राखीचे बंधन बांधू,
नाते सात जन्माचे.।।।३।।।।
आत्या आली मावशी आली,
काका आले काकू अली,
आला आला सण मोलाचा,
ओवाळी भाऊरायला.।।।४।।।
लहानपणी चिडवी मला,
रुसवा फुगवा होई,
मनात बहीण भावाचे प्रेम,
रक्षाबंधन ला विसरून जाई.।।।५।।।