भीती कुणाची कशाला?
भीती कुणाची कशाला?
संध्या छाया भिववीति हृदया!
वृद्धपणी का थरथरते काया!! १
भय इथलेच का संपत नाही?
मृत्यूची लागलीसे चाहूल बाई!!२
भय पार माझे वा-यासवे पळाले!
जीवन क्षणभंगुर जसे कळाले!!३
भीती कुणाची वाटते ही कशाला?
का ठेवती खिळा मग उशाला!!४
झोपेत भीतिदायक स्वप्न दिसती!
मनातली भूते मानगुटीवर बसती!!५
भय अनभिषिक्त सम्राज्ञी जगाची!
धैर्यशील देती मात त्या उगाची!!६
संपला तो जर का म्हणे भ्याला!
सांगून असे उत्तेजन देती त्याला!!७
भीती कोडग्याला नसे कायद्याची!
बाणवे निडरता अंगी फायद्याची!!८
पापाची मनासी त्या न भीती उरे!
सीमा क्रौर्याची गाठणे अंगी मुरे!!९
सत्कर्माची लागावी म्हणूनी गोडी
दंडनितीची असावी भीती थोडी!!१०
देशप्रेमींना मृत्यूचे भय नसते उरी!
निर्भयतेचे कंकण बांधतात करी!!११
