STORYMIRROR

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

4  

डॉ. मुक्ता बोरकर - आगाशे

Others

#बहीण

#बहीण

1 min
180

अलवार नात्यांची घट्ट करण्या वीण

प्रत्येकालाच दे ना देवा एखादी बहीण


मायेची पाखर घालून गोंजरते ताई

बहीण मोठी मग भासे दुसरी आई


हळूवार प्रेमाची अलगद पखरण ती करते

चुकले माकले कधी तर कानही पकडते


तिच्या प्रेम विश्वासाचे असे कवच भारी

सोबत तिची मनाला देते सदैव उभारी


लहानगी बहीण असते अवखळ नटखट

माझेच खरे म्हणून सारी तिची खटपट


नको त्या गोष्टींच्या चुगल्या करत बसते

चुकले ना सॉरी म्हणुन कानही पकडते.


शस्त्र रागाचे हिच्यावर काही चालत नाही

रुसलात का माझ्यावर म्हणत रडे रडूबाई


उजळून टाकते भावविश्व ती आपल्या परी

एक तरी बहिण प्रत्येकालाच हवी खरोखरी


Rate this content
Log in