STORYMIRROR

jaya munde

Others

3  

jaya munde

Others

भगवंता

भगवंता

1 min
343

दु:खाने आणिले 

खेचूनी चरणाशी,

मन उदास उदास

रमेना ते कशाशी..


तूच ठेवा आनंदाचा

जाईल ही उदासी,

ध्यान तुझे लागोनी

सलगी सौख्याशी..


आसरा भगवंता

हवेसे होई चिंतन,

 जीवनाच्या प्रवाहात

भौतिक नाशवंत..


उदास मनाला

तुझे नामगोडी,

क्षणोक्षणी मन

भजनात ओढी...


आले चरणाशी

सांभाळ तूच आता,

नश्वर सारे अंतरी

विसरले तुज जगता..


दुःख याद देई

सदा तुज दाता,

कळवळला आत्मा

तुजवीण मार्ग कोणता


Rate this content
Log in