भेट
भेट
1 min
215
भेटशील तेव्हा घे कुशीत एकदा
पोळलेल्या जिवास दे चाँदवा एकदा
काढू नकोस अर्थ भेटीचे वेगळे
आठवणीतल्या तुला भेटू दे एकदा
तरसशील तु ही तरसेल मी ही
परंपरेच्या बेडया तोडू दे एकदा
वांझ झाली आता जूनीच प्रिती
नव्याने दिप माझ्या उजळू दे एकदा
मनातील सारे भास तूझेच होते
गारवा मिठीतील मिळू दे एकदा
चांदणे माझे अन् चंद्र ही तू माझा
शरदाचे सत्व बरसु दे एकदा
सांगु कसे तुला प्रेम फार आहे
तुझ्यातले प्रेमही दिसु दे एकदा
