Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

भेगाळली मने

भेगाळली मने

1 min
173


कोरोना काळात मानव लागला मरायला

देवू शकत नाही मदत मानवच मानवाला...


हैराण झाला जीव या कोरोना विषाणूने

माणूसकी हरवली नातेवाईकामधे माणसाने....


उभे ठाकले कोरोना योद्धे आता सामोरी 

विषाणूची लागण होतेय जणूकाही आहे हाकामारी....


माया ममता सारे काही संपल्यासारखे वाटते

काय करणार आपलाही जीव कोण धोक्यात घालते....


शासनाने केलेय लाॅकडाउन जरी आता

घरोघरी राबतेय मुलाबाळांसाठी माता...


डाॅक्टर,पोलीस पार दमून थकून गेले 

उपचार करण्यात सारे खरचच मग्न झाले...


माणूस माणूसकी सोडून वागतोय खरा

भेगाळली मने सार्‍यांचा आटला प्रीतीचा झरा....


विसरूया कोरोनाला जरा ,माणूसकीचे रंग उधळूया

प्रेमाचे चार शब्द बोलून त्यांचे सात्वंन तरी करूया...


आपल्या नात्यामधे प्रेमाचा सांकव बांधूया

व्हिडिओ द्वारे नातेवाईकांशी संपर्क ठेवूया...


राग, लोभ, द्वेष, मत्सर सारे विसरून जावूया

माणसाने माणसाशी माणसासम खरेच वागूया....


Rate this content
Log in