STORYMIRROR

Manisha Wandhare

Others

3  

Manisha Wandhare

Others

भेद...

भेद...

1 min
144

 भेद कसा खुलला मनाचा कळेना मला ,

तुच प्राण केव्हा झाला प्रेमाचा कळेना मला ...

ओठ शिवले दिसता तु नजरेला दूर ,

उसवते बंध का ? जिव्हा फितूर कळेना मला...

ओढ तुझी चुंबकाची दुरावता येईना ,

उबंऱ्यावर का ? तुझ्या वाहे प्रेमफुले कळेना मला...

स्वार्थाचे पाश कधीच तुटले तुझ्यासाठी जगले,

माझे जगणे का ? तुझ्या श्वासांशी जुळले कळेना मला ...

चारोळीचे काव्य कधी बहरत गेले सखे ,

तुझ्या लावण्यावर का? लिहीत गेलो कळेना मला...

धार तलवारीला दिली जगण्याची खुमखूमी होती ,

जगण्याची धुंदी तेवढी होती की प्रेमाची कळेना मला ...


Rate this content
Log in