भैरवि
भैरवि
1 min
51
माझे शब्द, मलाच डसले
सगळ्यात होतो मी,
आपल्यात राहिलो नाही !
माझे जीवन, मलाच हसले
माणसात होतो मी,
माणसात राहिलो नाही ! &nbs
Advertisement
p;
माझे जगणे, मलाच नडले
जगण्यात होतो मी,
जगण्यात राहिलो नाही !
माझे हसणे, मलाच रुसले
सुखात होतो मी,
दुःखात राहिलो नाही !