भावविश्व
भावविश्व
1 min
298
काव्याची गुंफण
रत्नाकार झाली
भावविश्वात जणू
कशी फुलली.....॥१॥
गंधाळली रातराणी
काव्याच्या गंधाने
शब्दसुमनांच्या
आनंदाने.....॥२॥
झंकारली सुमधुर तार
काव्यत्वाची साद
क्षणाक्षणाला मिळे
प्रतिसाद.....॥३॥
नखाशिखांत भरला
काव्याचाच श्वास
नभात दरवळला
काव्य सुवास....॥४॥
अविरत झाला वर्षाव
शितल चंद्र चांदण्यावर
लिहीले मी काव्य
आयुष्यावर....॥५॥