भाववाढ
भाववाढ
1 min
212
जगायचं कसं हे आम्ही
आयुष्य भरलेलं संकटानं
केलं काय हो पाप इथं
होरपळलो महाघलेल्या खतदरानं
पिकं आमचं काव जातं
सदा सदा इथं अल्पदरानं
घ्यावो ऐकोणी कोणतरी
माझं हे दुःखाच गरानं
कष्टकरी मरतो आम्ही
इथल्या उन्हातांनानं
आणता काहो तुंम्ही सदा
आम्हा शेतकऱ्याचच मरण
लॉकडाऊननी या आमचं
विस्कळीत केलं हो जीवन
देवा तू ही कारे छळतोस
दुःखी केलंस या रोगान
ऐका हो मायबाप तुम्ही
जगू दया आम्हा सुखान
करा हो शेतमालाची भाववाढ
महागलेल्या खतदराप्रमाण
