भावना
भावना
1 min
203
भेट होता तुझी माझी
बदलूनी गेले जीवन
काय मोहिनी केली मजवरी
अर्पिले तूला मन
काय चालले आहे
याचे ना भान मला
व्याकुळिसी मन माझे
भेटण्या जीव आतूरला
सुंदरता तुझ्या मनाची
भरली या हृदयात
प्रेम जडले तुझ्यावरी
तूज पाहता स्वप्नात
मोकळेपणा स्वभावात तुझ्या
मज आवडे खूप
बांधून ठेवशी एकत्र
याचे वाटे मज अप्रुप
माझ्या मनातील भावना
तुला समजतील का
या प्रश्नाचे उत्तर
सखे मज देशील का
