भावना आणि बुद्धी
भावना आणि बुद्धी
भावनेला उगीच वाटायचं बुद्धीपेक्षा आपण श्रेष्ठ,
भावना प्रयत्न करायची प्रत्येक प्रसंगाला सामोरे
जातांना आपल्या पद्धतीने तो सोडविण्याचा------
बुद्धी आपल्या हुशारीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात चमकायची------
पण भावनेचा ओलावा मिळाला की वाटायचं आपण कुठेतरी चुकतो-----
पण ते क्षणिक असायचं---- बुद्धीला चांगलं काय?
वाईट काय? हे सांगताना थकून गेली बिचारी-------
अखेर हार पत्करून तिने बुद्धीचे श्रेष्ठत्व मान्य केलं------
खरंच ,जग चालतेच आहे ना ----बुद्धीच्या सामर्थ्यावर .
भावनेला जपून ठेवलंय सर्वांनी मनाच्या एका कप्प्यात
आणि दार बंद करून काम करत आहेत सर्वजण बुद्धीच्या जोरावर---
भावना एखाद्या वेळीच बाहेर पडते अन
उगाचच डोळयांच्या कडा ओलसर करून जाते.
