भाव इथे मांडतांना
भाव इथे मांडतांना
1 min
192
होता आव खोटा तसा
शब्द गुंफले कोणते
जरी सत्य होते त्यात
होते भाव ते कोणते
केला घात विश्वासाचा
निंदा होती नाहक ती
जादुगर शब्दांचा तो
खोटी जादू शब्दांची ती..
हवे वर्चस्व स्वतःला
भाव इथे मांडतांना
व्हावी मांजराची जात
काव्य खोटे वदतांना
उपासक ज्ञानाचा तो
अहंकारी वृत्ती तशी
अनुभव रोज नवा
रित वागण्याची कशी
