भाऊ💐🌹💐
भाऊ💐🌹💐
1 min
476
करते औक्षण आज भाऊराया
पंचप्राणाच्या ज्योतीने।
उदंड आयुष्य लाभू दे तुला
मागणे देवास माझ्या वतीने।
लहानपणी कधी रुसलो, कधी भांडलो तरी,
हाक मायेची कानावर।
अशी भाऊबीज येते अन् फुंकर
सुखाची हळुवार मनावर
अशा प्रेमळ, मायेच्या नात्याला नाव बहीण भाऊ।
आज भाऊबीज सण प्रत्येक भावाला शुभेच्छा भर भरून देऊ।
