STORYMIRROR

Kirti Borkar

Others

4  

Kirti Borkar

Others

भातुकलीचा खेळ

भातुकलीचा खेळ

1 min
412

मला वाटते घार व्हावे

आकाशात उंच उडावे

कधी फुलपाखरु होऊन

फुलांवरती हळूच बसावे


लहानगा बाळ होऊनी

माझी हट्ट ही पुरवावी

चोचीभर दाणा पाणी

पिल्लासारखी भरवावी


कधी वाटते तारे व्हावे

रात्रभर चमकत राहावे

चंद्राकडे टकमक बघत

कुशीत मस्त झोपी जावे


कधी पावसा रिमझिम

छोट्या हातावर झेलू दे

घराकाठच्या तळ्यावर

खेळ होडीचा खेळू दे


भातुकलीचा खेळ तसा

पुस्तकही वाचत बसू

पावसाआधी मोरासारखे

अंगणात नाचत बसू


Rate this content
Log in