STORYMIRROR

Shila Ambhure

Others

2  

Shila Ambhure

Others

भाषिक कोडे

भाषिक कोडे

1 min
318

छोटी आहे ती

मिणमिण करी


नाव आहे तिचे

तीनच अक्षरी


माहेर तिचे

कुंभाराघरी


फिरते गोल

ती चाकावरी


दिवाळ सणा

ती येते घरी


अंधाराला ती

बघा दूर सारी


उजेड देते

निर्जीव जरी


अशी कोण ती

अंगणी दारी


Rate this content
Log in