भाषिक कोडे
भाषिक कोडे
1 min
12K
अनमोल
नि मानाचा
खजिनाच
मी ज्ञानाचा.
जपला मी
इतिहास
गुरुही मी
असे खास.
अंतरात
शब्द,चित्र
तुमचा मी
आहे मित्र.
मीच तुम्हा
हसवितो
अन् कधी
रडवितो.
लागताच
माझा छंद
मिळवाल
हो आनंद.
निर्जीव मी
असे जरी
भाव नाना
या अंतरी.
कपाटात
दप्तरात
आजोबांच्या
मी हातात
पक्की दोस्ती
झाली राव
सांगा आता
माझे नाव.
