भाषा
भाषा
1 min
205
मराठी माझी भाषा
त्याचा महिमा वर्णू मी कसा
संतांची अजरामर वाणी
लिहिली मराठीत अभंगगाणी
भाषा माझी रसाळ
त्याचा आस्वाद मधाळ
भाषेत आहे आईची ममता
सर्वांना सामावण्याची क्षमता
मला अभिमान मराठीचा
करार केला मी आजन्म सोबतीचा
जेव्हा होते मी भावूक
मराठीतच शब्द सुचतात अचूक
