भाषा अभिमान
भाषा अभिमान
1 min
286
अभिजात सौंदर्याची खाण
कौशल्येचा साज मराठी
दगडांच्या देशात कणखर
महाराष्ट्राचा बाज मराठी.....१
रंगली शब्दांची मैफिल
काव्यरसात गुंफली मराठी
कुसुमाग्रजांची 'कणा' गाजली
ज्ञानामृते पैज जिंकली मराठी.....२
जन्मजात माय माऊली
मायेची सावली मराठी
पूर्व दिशेची पहाट
क्षितिजावर सांजलाट मराठी.....३
होई संतांची मांदियाळी
तुका, ज्ञानाची अभंग खेळी मराठी
नामदेवाची पावन पायरी
चंद्रभागा तीर पंढरी मराठी.....४
धन्य झाली इथली धरती
जगण्या लाभली माती मराठी
करूया जतन हा वारसा
अष्टपैलू बहुगुणी आरसा मराठी.....५