भारतमाता
भारतमाता


आज सर्व जनमानवानेच
कधी न पाहिली अशी प्रभात
महत्व स्वातंत्र्याचे अनन्यसाधारण
पण आज सारी बसली घरात....
गेली पाच महिने नियम,अटी घालून
सरकारही आले हो खूपच जेरीस
शाळा ,काॅलेज,सरकारी ऑफीसं
सारेच मुकले या स्वातंत्र्यदिनी फेरीस...
तिरंगाही आज निःशब्द जाहला
आकाशी झेपावताना,लहरताना
शाळांची मैदाने ओस पडली आज
नाही गायिली हो देशभक्ती गीतांना..
भारतमाता आज विचार करत असेल
हा देश माझा कसा दिन पाहतोय आज?
पण हे ही दिन जातील मानवा धीर धर
प्रजासत्ताकदिनाला चढवू सारे मिळून साज....
पुढील वर्षी २०२१ च्या स्वातंत्र्यदिनी
स्वातंत्र्याच्या नभात उधळू चांदणे आनंदाचे
आता जरी आपण साजरु करू शकलो नाही
तरी घरातच बसूनी करू स्वागत भारतमातेचे...