Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Warade

Others

3  

Pandit Warade

Others

भाग्य पहाट झाली

भाग्य पहाट झाली

1 min
178


भाग्य पहाट झाली, दिंडी दारात आली ।

वैष्णवांच्या दर्शने, भेट विठूची झाली ।।धृ।।


संसारात शिणलो, धाव धाव धावलो ।

जिथे होते जायचे, तिथे ना पोहोचलो ।

पोहोचणार कैसा, वाट जिथे चुकली ।।

वैष्णवांच्या दर्शने, भेट विठूची झाली ।।१।।


जावे वाटे मनाला, विठ्ठलाच्या भेटीला ।

भव सागरी आला, जीव मेटाकुटीला ।।

विठ्ठल दर्शनाची, आस जीवा लागली ।।

वैष्णवांच्या दर्शने, भेट विठूची झाली ।।२।।


मुखाने जयघोष, विठ्ठलाच्या नावाचा ।

वाजे टाळ मृदंग, ठाव घेई मनाचा ।।

वैष्णवांना पाहून, थकावट पळाली ।।

वैष्णवांच्या दर्शने, भेट विठूची झाली ।।३।।


Rate this content
Log in