बेधुंद
बेधुंद
1 min
228
पाऊस, वारा, नभी जलधारा, हासल्या अशा
बेधुंद होऊनी,मयूर हा नाचला जसा
वेलीवरती फुलेही झुलती
फांदीवरती पक्षी
भिजली पाने गाणी गाती
तरूवर हिरवी नक्षी
आनंदाचा सण हा साजरा जाहला असा
बेधुंद होऊनी मयूर हा नाचला जसा
थेंब टपोरे करीती टपटप
मातीचा ये दरवळ
पाऊस पडतो रिमझिम रिमझिम
पाण्याचीही खळखळ
या सार्यांचा खेळ संगती, चारही दिशा
बेधुंद होऊनी मयूर हा नाचला जसा
पायी बोले पैजण छमछम
रंगुनी सारे दंग
भिजूनी गेले सारे तनमन
सृष्टीचेही अंग
बहर, हास्य, चैतन्य, आगळा उमटे हा ठसा
बेधुंद होऊनी मयूर हा नाचला जसा
