STORYMIRROR

Dilip Yashwant Jane

Others

3  

Dilip Yashwant Jane

Others

बेडी

बेडी

1 min
284

विज्ञानाची कास धरू

करु प्रगती मानवा

नको जपू अंधश्रद्धा

मनी भाव शुद्ध हवा


युग विज्ञानाचे सारे

रोज लागतात शोध

गम्य होई रे सारेच

घ्यावा अंतरी हा बोध


शोध तू कार्यकारण

प्रसंगांचे घटनांचे

कोडे उमजेल तुज

साऱ्या अजब सृष्टीचे


सोड साऱ्या अंधश्रद्धा

पुढे पडावे पाऊल

उखडून टाक बेड्या

विज्ञानाची घे चाहूल


तोड बेडी पायातली

झुगारून बंध सारी

दृष्टी लाभेल नवीन

उंच घेऊच भरारी


साहित्याला गुण द्या
लॉग इन