बदलते वारे
बदलते वारे
1 min
260
फार झाले ओवाळणे त्यांची आरती
नव्या कळ्या उमलल्या दिव्य भारती
जुने झाले प्रस्थापित त्यांचीच स्तूती
दाद द्यावी नवोदिता नवीन कृती
तप्त स्वर विद्रोहाचे विरून जाती...!
कुठून कसे संबंध जोडती नाती
त्यांची घराणी प्रस्थापित अन मोठी
नवोदितांची अडवणूक करती
साम, दाम, दंड, भेद वापर नीती
प्रसिद्धीची माध्यमे सारी त्यांच्या हाती..!
दुय्यम स्तर मारती कायम माथी
अन्यायाची ना कधीही वाच्यता होती
उद्रेक होईल कमाल कधीतरी
तोंड लपविणे मुश्किल देशांतरी
विकून मत्ता करिती मजा मनस्वी
देशाची संपदा परहस्ते लुटवी
