बबड्याची सकाळ झोप...
बबड्याची सकाळ झोप...
रात्र बबड्याची मस्तीत जाते
अगदी परीच्या कथेसारखी
सकाळ झोप झोप म्हणते
लोळण्यास आळशीसारखी...१
मंद थंडगार वारा लोळायला
मग रोजच त्याला पाडतो भाग
थंडी जणू आवडतीच राणी
खुशाल येते काढत माग...२
झोपेचा मोह जरी आवरत नाही
मात्र भय रिकामटेकडे सतावते
मग झोपेशी जमते चांगलीच गट्टी
ती खुशाल कवेशी लपेटते...३
सकाळी बबड्याच्या नावाचा
आगडोंब चाले मोठाच भयंकर
सगळयांचा आळशीपणाचा
चमचमीत पाठ गाजे शुभंकर...४
चंद्र वाटे त्याला रात्रीचा पोरखेळ
सूर्य वाटे फारच आडमुठा हलकट
बबड्याचा असला सुट्टीचा दिवस
सकाळची झोप जणू महासंकट...५
