बावन्नखणी मराठी
बावन्नखणी मराठी
1 min
396
बावन्नखणी मराठी
मायबोली अशी खास
मायेच्या पदरावर
स्वर-व्यंजनांची रास
बोल माझ्या मराठीचे
माया ममतेचा भास
मन जपते जपते
गोड शब्दांची आरास
व्याकरणाची जोड
शुद्धलेखनाने वृद्ध
अलंकारांचा हो साज
छंंद लय ताल बद्ध
काना मात्रा वेलांटीची
नीराळाच आहे थाट
उकार अनुस्वार ही
रचले जातात दाट
मराठीची ही श्रीमंती
शब्दास अर्थ अनेक
स्वाभिमानी बाणा माझा
जपे मराठीची लेक
