STORYMIRROR

Priyanka Pawar

Others

3  

Priyanka Pawar

Others

बाप

बाप

1 min
320

दोन शब्द बाबासाठी .......


आईसाठी अनेक कविता बनवल्या जातात. लेख लिहिले जातात. आईसाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या मनातील भावना व्यक्त करते. 

परंतु बाप हा क्वचितच शब्दांतून मांडला जातो. बाप, वडील, पप्पा, ङॅङ, बाबा या शब्दांबद्दल फारच कमी प्रमाणात बोलले जाते. खरे तर या दोन अक्षरी शब्दांत संपूर्ण विश्व सामावलेले आहे.


आई ही घरातील वात आहे, 

तर बाप हा घरातील दिवा आहे.


बाप , वडील, पप्पा, ङॅङ 

कोणत्याही नावाने संबोधा,

पण शेवटी बाप हा बाप असतो. 


पहाटेपासून ते रात्रीपर्यंत  

आपल्या पिलांसाठी जीवाचे रान करणारा, 

बाप हा बाप असतो. 


सण नाही, उत्सव नाही, बघत तो ...

फक्त आपल्या पिलांच्या सुखासाठी,

रांत्र दिवस तो धडपडत असतो. 


झोप नसते हो, त्याच्या जीवाला,

तरीही रक्ताचे पाणी करून,

तो आपल्या पिलांना वाढवत असतो. 


असतात हो ,

त्याच्या ही खूप अपेक्षा. ..

पण आपल्या पिलांकङे पाहून 

तो आपली स्वप्नं अश्रूंनीच मिटवून टाकत असतो.....


 कारण बाप हा बाप असतो.


स्वतःचा जीव मुठीत घेऊन 

तो रात्रीचा दिवस करत असतो. 


स्वतःच्या इच्छा मनात मारून 

तो आपल्या पिलांसाठी आयुष्यभर धडपडत असतो.


खूप वाईट भावना व्यक्त केल्या जातात,

या बापाबद्दल ....


पण शेवटी त्याला देखील मन असते, 

हे समजून घेणे आपले कर्तव्य असते.


कारण बाप हा बाप असतो.


कितीही वाईट वागा तुम्ही, 

कितीही रागवा तुम्ही, 

तरीही तो आपल्याला प्रेमाच्या वास्तव्यातच ठेवतो.


असा हा बाहेरून कठोर दिसणारा बाप 

मनातून खूपच प्रेमळ असतो.


बाप संपूर्ण कुटुंबाला सावरणारा,

निमूटपणे प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाणारा..


शेवटी बाप हा बाप असतो.


मनातून कितीही तुटला तरीही,

बाहेरून कणखर दाखवणारा. 

बाप हा बापच असतो. 


कितीही बोलावे,  

तरीही कमीच आहे.

कारण बाप हा आपल्या पिलांचे नशीब घडवत असतो.


म्हणून तर बाप हा बाप असतो.


Rate this content
Log in