STORYMIRROR

Priyanka Shinde

Others

3  

Priyanka Shinde

Others

बाप...

बाप...

1 min
189

मायेच्या तारेनं परिवाराला एकत्र बांधणारा हा बाप असतो,

प्रेमाच्या धाग्यांनी स्वतः परिवाराशी बांधला गेलेला हा बाप असतो,


बाप काय आहे...? बाप काय आहे हे शब्दात सांगणं कठीण असतं,

कारण बाप काय आहे हे फक्त एका बापालाच कळु शकतं,


जीवनात संघर्षाची वेळ जेव्हा येते तेव्हा सारेच जण खचून जातात

पण इतरांना धीर देतं संघर्षाला खंबीरपणे सामोरं जाणारा हा बाप असतो,


स्वतःचे दुःख दडवून मुलाचे दुःख जाणून घेणारा हा बाप असतो,

मुलांच्या वागणुकीवरून वाईट गोष्टींवर बंधनं लादणारा हा बापच असु शकतो,


घर कितीही माणसांनी गजबजलेलं असलं तरीही

घरातला कर्ता म्हणुन ओळखला जाणारा हा बाप असतो,

दिवस-रात्र मेहनत करून घरा-दाराला जीवापाड

जपणारा हा बाप असतो,


मुला- बाळांसाठी स्वतःचे अस्तित्व विसरून मर-मर मरणारा

आणि सदैव नको तेवढे त्रास काढून खपणारा आणि झटणारा,

मुलांच्या इच्छेखातर स्वतःच्या इच्छा दडपवणारा हा बापच असु शकतो...


वर वर कितीही राग असला तरी मनात नितळ प्रेम असतं,

बापाचं कर्तव्य निभावण्यासाठी कुठल्याही बापाला कठोर

हे व्हावचं लागतं... कारण शेवटी बाप हा बाप असतो..


Rate this content
Log in