बाप
बाप
1 min
14.3K
मज आकाशी बघता
आठवतो बाप माझा
जाता सागरा किनारी
गंध जाणवतो ताजा
नील अंबरी पाहता
आज याद येई पिता
जागे मनीची वेदना
या अंतरी आठवीता
माय माझी देवरूप
भासे देवाचा तू देव
मज दोघे रामसीता
या हृदयातली ठेव
माय मायेचे मंदिर
तू करुणेचा सागर
मनी कवच कठोर
दया क्षमेचे आगर
