बाप
बाप
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
47
साधाभोळा दिलदार
बाप तो रुबाबदार ||1||
कष्ट करून पोसले
देवा समान भासले ||2||
नाव दिलीप तयांचे
पिता प्रेमळ आमचे ||3||
छायाछ्त्र आम्हासाठी
शक्ती दिली यशासाठी ||4||
यशवंत कीर्तिवंत
व्यक्ती ते प्रतिभावंत ||5||
भेद ना मुलामुलीत
सम ते वागणुकीत ||6||
निर्मळता स्वभावात
द्वेष कधी कोणात ||7||
दैव दैवत मानिले
सुख दुःखात लाभले ||8||
आशीर्वाद सदा दिला
शिस्त सन्मार्ग दाविला ||9||
समाजात मान त्यांचा
हात दिला मदतीचा ||10||
यशवंत ह्या पित्याची
दिपा लेक भाग्यवंत ||11||