STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

4  

Sanjay Raghunath Sonawane

Others

बाप

बाप

1 min
41.7K



माय जाते जगातून लेकरे निराधार

बाप होतो माय तव्हा जगण्या आधार

मायची रे जागा बाप हाकतो नेटाने

भरवितो घास त्याच्या कष्टाच्या हाताने

सुखामध्ये सुख होतो दुःखात आधार

उभ्या आयुष्याचा ध्यानी घोळतो विचार

आसवांची थेंबे फुटे मायेचा पाझर

पोटासाठी बाप लेकराना शोधतो भाकर

आसुसलेल्या लेकराना बापाचीच माया

त्यांच्या पोटासाठी झिझवितो काया

बापाच्या शब्दानी मिळतो जगण्यास धीर

गरीबीत जगताना नाही लाचारपण

फुलासारखे जपले आमचे बालपण

शिक्षण सारे दिले त्यांचे थोर संस्कार

माय सारखे काळीज बापाचे भी हाय

उभ्या आयुष्यात राबतच रहाय

अनुभवी जगामध्ये बाप शिल्पकार

माय सारखी बापाची हाय शिकवण

सत्यानेच जगा जगामधी हिम्मतीने

आयुष्य जगताना करा सारासार विचार


Rate this content
Log in