बाप नावाचा देवमाणूस
बाप नावाचा देवमाणूस
माय लेकरे सारी तयाला
घराला कसलं दडपण नाही
बाप आपला कष्ट करून
कुटुंबाला आधार देत राहि
बापाची धडपड आयुष्यभर
साथ देणारी असावी लागते
त्याच्या विश्वासावरती सारी
कुटुंबाची काळजी असते
संकट येऊनी थांबलाय आज
कुटुंबाला आधार आहे त्याचा
घरचा देव माणूस मानून जबाबदारी
पार पाडावी लागते आज त्याला
घराला घरपण नाही बापाविना
कसा थाटला जातोय संसार
किमया सारी साधली जातेय
कुटुंबाला आहेत त्याचे संस्कार
लेकरासाठी बाप भाकर तुकडा
घाम गाळत कुटुंबाची करतो सेवा
आजारी पडला तरी बाप आपल्या
जीवाची चिंता न करता असावी पर्वा
बापच सुख समाधान जगात कुठेच
विकत न घेणारी जणू वस्तू
शेतात राबणाऱ्या कष्टकरी बापाला
सुखी माणूस आठवण आहे त्याची वास्तू

