बाप माझा शेतकरी
बाप माझा शेतकरी
1 min
449
बाप माझा शेतकरी
सार्या जगाचा पोशिंदा
भाळी लिहीला त्याच्या
सदैव कामधंदा (१)
बाप माझा शेतकरी
दिनरात राबतो कष्टतो
लोका देऊन निवाला
स्वता मुकतो घासाला (२)
बाप माझा शेतकरी
कसतो काळी माती
मातीतून उगवती
टपोर्या कणसाचे मोती (३)
बाप माझा शेतकरी
आपुल्या बैलांस जपतो
बाप त्यांचाही होऊन
मुलासारखी काळजी घेतो (४)
बाप माझा शेतकरी
साथीला घरधणीन
घास प्रेमानं भरविते
कष्टाला उसंत मिळते (५)
बाप माझा शेतकरी
झिजवितो हाडं-काडं
कष्ट नको लेकराला
शिकून साहेब होईल (६)
