STORYMIRROR

Varsha Shidore

Others

3  

Varsha Shidore

Others

बाप लेकीची मिठी

बाप लेकीची मिठी

2 mins
356

तो पहिला तान्हा मऊ स्पर्श 

आजही घट्ट जसाच्या तसा 

मिठीत विरघळतो हलकासा 

जणू आसऱ्याचा श्वास असा 


वाढत्या वयाचे लैंगिक बदल 

बाबाही समजायला लागलाय 

नैसर्गिक प्रक्रिया म्हणून लेकीस 

मायेने घट्ट मिठीत घेऊ लागलाय


मनाला बोचणाऱ्या व्यथा 

लेकीशी तो बोलून दाखवतो 

समाजाच्या वाकड्या नजरा 

डावलून प्रेम मिठी स्वीकारतो 


सगळं कामधाम सोडून धावतो 

लेकीच्या हट्टापायी तो नरमतो 

धाकात तिच्या अलगद विरघळतो 

एका मिठीत आयुष्यभर विसावतो 


लग्नाची घटिका समीप येता 

अश्रू अनावर दोघा बाप लेकीला 

घट्ट मिठीची गरज एकमेकांना 

तेव्हा सारं जग एका बाजूला


पुरुषप्रधानतेचं घोडं तो आता 

गाजवत नाही नि मिरवतही नाही 

तिच्या अधिकारांचा क्षुद्र बळी 

अज्ञानापायी जाऊ देत नाही 


भेदभावाच्या चौकटीत अडकवून 

स्वच्छंदी स्वप्नपंख छाटत नाही 

पेहरावाचा झाला जरी गाजावाजा 

तरी दोषी तिला कधी ठरवत नाही 


नातं समाजाविरुद्ध जातंय का 

फरक बापाला जाणवत नाही 

मग दूषणांची अशी वाईट मिठी

पवित्र नात्याला कुरवाळत नाही


Rate this content
Log in