STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Others

बाप- कविता

बाप- कविता

1 min
1.0K


बाप-मराठी कविता
कवी-संजय रघुनाथ सोनवणे
बाप मेल्यावर हुंदके कशाला?
उगाच ढोंग नको दाखवु लोकाला
खोटे अश्रू का दावतो दुनियेला
दुःखाचा देखावा नको दाखवू जगाला

जीवंतपनी नाही घास घातला
तुझा एक, एक शब्द जहर झाला
तुझ्या धाकाने तो तसाच गिळला
अश्रु ढाळत तो तसाच पचविला

जीवंतपनी नाही कधी रे पुसले
बाप म्हणून कधी नाही रे समजले
गुलामासारखे मला वागविले
नात्यागोत्यात अपमानित केले

खडतर कष्टातून तुला वाढविले
हृदयाचे काळीज तुला समजले
दुनियाचे दुःख तुला नाही दिधले
पोटचा गोळा म्हणून सारे अर्पिले

व्यसनातून तू नाही रे सुटला
संसार सुखाचा उध्वस्त केला
तुझ्या चिंतेने जीव रे गेला
स्मशानात देह माझा जळाला


Rate this content
Log in