बांधावर
बांधावर
1 min
414
घालविला मी माझा क्षण
घरच्या हिरव्या बांधावर
घेतला वसा मी कुटुंबाचा
माझ्या स्वतःच्या खांद्यावर
बोललो हिरव्या पालव्यांशी
कुठे उने निसर्गात राहिले
हिरव्या पानावर थेंब पिवळे
का ? पानगळी आधी आले
सजली होती शृंगाराने
मुलायम अशी वसुंधरा
थेंब मोत्याचे पिऊन तृप्त
वाहून गेला लबाड वारा
बांधाच्या बाजूला हसत होता
निळ्या पाण्याचा खळ खळ झरा
ठेवले पाय पाण्यात तेव्हा
मिळाला जगण्याचा आनंद खरा
वाटे पुन्हा पुन्हा घालवावा
बांधावर दिवस कुटुंबासोबत
करावे हलके मन पुन्हा एकदा
प्रत्येकाच्या मना मनासोबत
