STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Others

बालपणी चे स्वंगडी..

बालपणी चे स्वंगडी..

1 min
171

बालपणीचा काळ सुखाचा

हर्ष,मौज नी आनंदाचा ,

विसरुन स्वत:लाही निरागस

खेळ, खेळण्यात रमण्याचा.


बाहुलीतही गुंतला जीव

जीवापाड प्रेम करावं,

प्रेमाने घेऊन पप्पी गोड

जीवापाड त्यास जपावं.


खरंच किती गोड बरे

बाहुली, खेळण्याची पप्पी,

खेळ, खेळण्यात गुंतला जीव

जमली किती ही गट्टी..!


सर्वच जाई विसरुन

अगदी बेभान होई,

बाळाला खेळणी प्यारी

जसे बाप नी आई...!


असाच जडावा जीव

नात्यातल्या माणसावर,

स्वार्थाने नको होऊ हैवान

बाळा तू मोठा झाल्यावर...


Rate this content
Log in